संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १, ( बदलापूर पश्चिम दिशेने ) येथे २ इसमांनी गोळीबार केल्याचा प्रकार समोर आलाय.
गोळीच्या आवाजाने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन धावपळ सुरु झाली त्यात काही जण जखमी देखील झाले आहेत.
एका मित्राकडून दुसऱ्या मित्रावर गोळी झाडण्याचा प्रयत्न
गोळीबारा झाल्याचे समजताच डीसीपी मनोज पाटील घटनास्थळी रवाना झाले. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात नेण्याचे कार्य सुरु केले.
सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांमध्ये वैयक्तिक कारणांमुळे मोटा वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये मोठे भांडण झाले. त्यामुळेच एका मित्राकडून दुसऱ्या मित्रावर गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, गोळी कोणालाही लागलेली नाही.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या बाजारपेठेत चौघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर चौघे रेल्वे स्थानकावर आले. त्यांच्यामधील वाद आणखी वाढला. दरम्यान, भांडण टोकाला गेल्यानंतर एकाने बंदुक काढत गोळीबार केला. तसेच इतरांवर फायर करण्याचाही प्रयत्न केला. फायरिंग करून २ इसम रिक्षात बसून बदलापूर पश्चिम येथून पळून गेले. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु करण्यात आलाय.
बातम्यांच्या update साठी आपले Whatsapp चॅनेल जॉईन करा.