नवरात्री – दिवस ६: स्त्री शक्तीची पूजा – कात्यायनी

Navratri- Katyayani
Source : Pinterest
स्वर्णाआज्ञा चक्र स्थितां षष्टम दुर्गा त्रिनेत्राम्। वराभीत करां षगपदधरां कात्यायनसुतां भजामि॥

देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे, जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत. कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण,वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. हि देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतिक आहे. आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय.

कात्यायनी हे देवीचे सहावे रूप आहे आणि तिचे नाव तिचे वडील कात्यायन ऋषि ह्यांस कडून घेतले आहे; हे माते दुर्गाचे क्रोधित रूप आहे, या रूपाने तिने महिषासुर राक्षसाचा नाश केला. खरतर सर्व मुलींनी आपल्या मध्ये ह्या रूपाची पुस्ती करायला हवी, महिला स्वसंरक्षण ही काळाची गरज बनली आहे, त्यामुळे महिलांनी वेळ पडल्यावर महिषासुराचा वध देखील केला पाहिजे, स्वतः ची सुरक्षा स्वतः करावी त्या साठी इतर कोणावर अवलंबून राहणे कितवर योग्य?

आपण नाईट लाइफ सारख्या वेस्टर्न संस्कृती ला मुंबई मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि दूसरी कडे महिला रस्त्यावर किती सुरक्षित आहेत ?

लिंग समानता

 स्त्रियांना त्यांच्या कर्तृत्वासाठी मान्यता मिळणे अजूनही एक आव्हान आहे. आपण एका युगात जगतो जिथे स्त्रिया राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भाग घेतात, परंतु त्यांना घर आणि कामाच्या ठिकाणी दुय्यम स्थान दिलं जातं. आपण खरोखरच या समस्यांना सामोरे जाण्यासाठी काही करत आहोत का? की आपण त्यांना नुसतं सामाजिक चर्चेच्या सीमेत अडकवून ठेवत आहोत?

Gender Equality
Source : Pinterest

देशात महिला आजही असुरक्षिततेच्या छायेखाली जगत असल्याचे महिला आणि बालविकास खात्याने केलेल्या पाहणीत स्पष्ट दिसते आहे. आर्थिक प्रगतीचा आणि पुरोगामीपणाचा दावा करणारी महाराष्ट्रासह अनेक राज्ये पिछाडीवर आहेत. सरकारने पहिल्यांदाच हा लैंगिक सुर‌क्षा निर्देशांक (जेंडर व्हर्नबिलिटी इंडेक्स) काढला. त्यातून महिला धोरणाच्या अपयशाचा पंचनामा झाला. सर्वांत सुरक्षित राज्यांच्या यादीत गोव्याने सर्वांत वरचा क्रमांक पटकावला, तर पाठोपाठ केरळ, मिझोराम, सिक्कीम, मणिपूर या राज्यांचा क्रम लागतो.

शिक्षण, आरोग्य, गरिबी आणि हिंसेपासून संरक्षणाबाबत महिलांना सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांकडे या सर्वेक्षणाने लक्ष वेधले. अपेक्षेप्रमाणे बिहार सर्वांत तळात आहे, उत्तरप्रदेश आणि राजधानी दिल्लीचा क्रमांक अनुक्रमे शेवटून दुसरा आणि तिसरा. या सर्वेक्षणाने देशातील लिंगभेदावर बोट ठेवले आहे. लिंगभेदाच्या विरोधातल्या शिक्षणाचे प्रयत्न सुरू असले तरी त्यात अजून यश आलेले नाही. राजधानी दिल्लीसारख्या महानगरातही महिला सुरक्षित नाहीत. निर्भया हे त्याचेच प्रातिनिधिक उदाहरण. शिक्षण, आर्थिक आणि सामाजिक स्तर हेच प्रमुख घटक महिलांच्या सुरक्षिततेवर प्रभाव टाकत असतात.

समाजाच्या नजरा, बाई विषयीच्या विपरीत कल्पना आणि विषमतेची भावना यामुळे  ती सतत दबलेली असते. तिच्या प्रत्येक ठिकाणच्या सुरक्षिततेचा प्रश्न वेगळा आहे कारण तिच्या असुरक्षिततेचे प्रत्येक ठिकाणचे स्वरूप वेगळे आहे. त्या प्रत्येक ठिकाणी तिला सुरक्षितता असावी म्हणून वेगवेगळे कायदे करावे लागत आहेत.

तिला पोटात कोणी मारून टाकू नये म्हणून वेगळा कायदा,

तिला वयात येताना कोणी आपल्या वासनेचा बळी करू नये यासाठी वेगळा कायदा,

तिच्या नवऱ्याने किंवा सासरच्या लोकांनी छळू नये म्हणून वेगळा कायदा असे निरनिराळे कायदे करण्यात आले आहेत.

काही वेळा एकदमच आंदोलने सुरू होतात किवा एखाद्याच प्रकरणाला भरपूर प्रसिद्धी  मिळते. 2012 च्या डिसेंबरमध्ये दिल्लीत एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. त्याचे पडसाद देशभर उमटले. असे पडसाद उमटता कामा नयेत असे काही आपण म्हणू शकत नाही. परंतु दिल्लीतल्या मुलीवर बलात्कार झाल्यामुळे एवढे तीव्र पडसाद उमटतात तसे ग्रामीण भागातल्या मुलीवर झाल्यास उमटत नाहीत. त्यामुळे या ग्रामीण मुलींच्या किंकाळ्या आपल्या सरकारच्या कानावर पडत नाहीत.

Gender Equality
Source : Pinterest

घरगुती असमानता:

आणि घर? घरामध्ये महिलांचे योगदान ‘स्वाभाविक कर्तव्य’ म्हणून का पाहिले जाते? का पुरुषांकडून याकडे ‘सहाय्य’ म्हणून बघितले जाते? ही मानसिकता बदलायला किती वेळ लागेल? की महिलांना केवळ एक गृहिणी, आई किंवा पत्नी म्हणूनच पाहिले जाईल, त्यांच्या वैयक्तिक इच्छांना, कर्तृत्वाला फारसा महत्त्व दिला जाणार नाही?

संस्कृती आणि धर्माचे बंधन:

कित्येक संस्कृती आणि धर्मांमध्ये अजूनही स्त्रियांवर अनेक बंधने आहेत. नववधूच्या आयुष्याचे निर्णयही तिच्या स्वतःच्या हाती नसतात. का अजूनही स्त्रियांना ‘संपत्ती’ म्हणून पाहिले जाते? का त्यांना समानतेचा हक्क दिला जात नाही?

समाजाने आपले दृष्टीकोन कधी बदलणार?

पुरुष आणि स्त्रियांमध्ये असणारी ही असमानता केवळ कार्यक्षेत्र, कुटुंब किंवा धर्मापुरती मर्यादित नाही. ती आपल्या रोजच्या संवादातून, मानसिकतेतून, संस्कारांतून उत्पन्न होते. कधी बदलणार समाजाची ही धारणा? कधी आपण स्त्रियांना एक समानतेचा दर्जा, समान हक्क, आणि समान संधी देऊ?

आपल्या मानसिकतेत बदल आवश्यक आहे का?

आजच्या काळात, आपण तंत्रज्ञानात आणि विज्ञानात प्रगती केली आहे, परंतु आपल्या समाजातील या बंधनांपासून मुक्त झालो आहोत का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला आपल्या मुलांना समजावून सांगावं लागेल की लिंग कोणत्याही कामाच्या योग्यतेचं मापदंड नसावं. ती केवळ एक जैविक वैशिष्ट्य आहे, क्षमता आणि कर्तृत्वाला नाही.

शेवटी, प्रश्न असा आहे की, आपण खरोखरच समानता देतोय का? की फक्त त्यावर चर्चा करत बसलो आहोत?

लेख आवडल्यास तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि टिप्पणी पोस्ट करा Newser Friendly आता WhatsApp चॅनेलवर उपलब्ध आहे. तुमच्या चॅटवर न्यूजर फ्रेंडली कडून सर्व नवीनतम लेख मिळविण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment