नवरात्री – दिवस १: स्त्री शक्तीची पूजा- शैलपुत्री

Navratri 2024 shailputri
Source : Pinterest

(Navratri) नवरात्रीचे दिवस आहेत, स्त्री शक्तीची पूजा केली जात आहे,गरबा खेळताना उल्हास दिसतोय आणि दुसरीकडे देशात अशी परिस्थिति आहे जी ह्या गोष्टी ला नकरताना दिसत आहे, जी आपल्याला लहानपणा पासून शिकवली जात  आहे.

Navratri श्लोक

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।

यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।

“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः” या संस्कृत श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया सन्मानित, पूज्य मानल्या जातात, तिथे देवता वास करतात, म्हणजेच तिथे सुख-समृद्धी आणि आनंद असतो. आणि ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान होत नाही, तिथे सर्व क्रिया निष्फळ ठरतात, म्हणजेच त्या ठिकाणी काहीही चांगले होत नाही.

शैलपुत्री

नवरात्रीचा प्रथम दिवस, देवीचे पहिले रूप – शैलपुत्री. शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या,मुलगी.देवीच्या या रुपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते.भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरणाने मात्र  खंबीर,निडर आणि शांत होण्यास मदत होते.

विरोधाभास

किती विरोधाभास एकीकडे पुत्रीची पूजा आणि दुसरीकडे तिची शिकार

अश्या अनेक घटना आपल्याला शोधायला वेळ सुद्धा लागणार नाही

डेटा

NCRB ने प्रस्तुत केलेल्या 2016 च्या आकडेवारी नुसार  2016 मध्ये 82 %  (39000) बाल लैंगिक शोषण मध्ये वाढ झाली आहे.

पोस्को अंतर्गत 28,046  बलत्काराच्या घटना नोंदवल्या आहेत तेही एका वर्षात

2014 ते 2022 या कालावधीत महिलांवरील गुन्ह्यांमध्ये 31% वाढ झाली आहे.

येत्या काळात ह्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे, सरकारने कितीही योजना आणल्या कितीही कठोर शिक्षा निश्चित केल्या तरी बेभान माणसाच्या वाईट संस्कारी बुद्धीला परिणामाची चिंता नसते, जेव्हा त्याला वासनेची भूक असते त्यामुळे गरज आहे वैचारिक बदलांची समाजाच्या प्रगतीची आणि स्त्रियांच्या आदराची

संकल्प

चला तर ह्या नवरात्रीत आपण संकल्प घेऊया की कुण्या दुर्गाला गर्भपात न करावा लागो 

कुण्या सरस्वती ला शाळेत जाण्यापासून वंचित न रहावे लागो

कुण्या पार्वती ला हुंड्याची बळी न चढायला लागो

कुण्या सीतेला अन्यायाविरोधत गप्प न बसायला लागो

कुण्या लक्ष्मी ला आपल्या पती कडून पैसे मागण्यासाठी गयवाया न करायला लागो

आणि कुण्या काली ला तिच्या रंगामुळे सुंदरतेची परिभाषा न शिकायला लागो

लेख आवडल्यास तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि टिप्पणी पोस्ट करा Newser Friendly आता WhatsApp चॅनेलवर उपलब्ध आहे. तुमच्या चॅटवर न्यूजर फ्रेंडली कडून सर्व नवीनतम लेख मिळविण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment