नवरात्री – दिवस ५: स्त्री शक्तीची पूजा-स्कंदमाता

Source: Pinterest

(Navratri) नवरात्रीत बालविवाह आणि मुलींच्या शिक्षणाच्या अडचणी, त्याचे परिणाम, आणि समाजात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाय यावर चर्चा करूयात…

“सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया. शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी."

Navratri स्कंदमाता

स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे. बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे. सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे.

स्कंद म्हणजे तज्ञ,निष्णात. सामान्यपणे जे तज्ञ,प्रविण असतात ते उद्धट असतात. पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे. देवीच्या या रुपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात.

आणि निरागस अश्या बालिकेच्या खेळण्याच्या, शिक्षण घेण्याच्या वयात आपला समाज तिचे लग्न लाऊन देतो.

बालविवाह

Source : Pinterest

बालविवाह आणि मुलींचे शिक्षण हे सामाजिक विकासासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत. बालविवाहामुळे मुलींचे शैक्षणिक, सामाजिक आणि मानसिक विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. कमी वयात लग्न झाल्यामुळे त्या मुलींना शिक्षण घेण्याची संधी मिळत नाही, ज्यामुळे त्यांचे भविष्य धोक्यात येते. शिक्षण हा मुलींच्या जीवनातील प्रगतीचा मार्ग आहे; त्यांना स्वावलंबी आणि आत्मविश्वासू बनवतो. शिक्षणामुळे मुलींची सक्षमता वाढते आणि त्या स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक होतात. बालविवाह रोखून मुलींना शिक्षणाची संधी दिल्यास समाजात एक सकारात्मक बदल घडवता येऊ शकतो. त्यामुळे मुलींचे शिक्षण हा बालविवाह रोखण्यासाठी आणि समाजात प्रगतीसाठी एक प्रभावी उपाय आहे.

कोरोना काळात आपल्या आसपास आपण बघतोय किती मुलींचे लग्न अगदी लहान वयात च केले गेलेत, गावात ही परिस्थिति अधिक आहे आणि शहरात देखील नकारता येण्या जोगी नाहीये इकडे १२ वी झाली की शिक्षण संपल आता लग्न लाऊन द्या.

गावात आणि इतर अशिक्षित भागात ही परिस्थिति अधिक गंभीर्याची आहे, त्या निरागस मुलीचे लग्न तिच्या वयाच्या दुपटीने असलेल्या माणसासोबत लाउन देणे आणि मग तिच्यावर जबाबदारी पडते संसाराची. भातुकलीचा खेळ खेळता खेळता हे सर्व कधी सत्यात येत हे कळत सुद्धा नाही.  

आकडेवारी

Source : Pinterest

15 ते 19 वयोगटातील 16 टक्के किशोरवयीन मुली सध्या विवाहित आहेत. बालविवाहाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो आणि दारिद्र्याचे चक्र सतत फिरत राहते मुलगा व मुलगी जेव्हा लहान वयात लग्न करतात तेव्हा त्यांच्या कडे ना कला असते, ना शिक्षण, ना नोकरी ज्या मुळे आर्थिक परिस्थिति आणखीन खालावते बालविवाहा मुळे, व साक्षरतेच्या अभावा मुळे  जास्त मुले जन्माला येतात, ज्यामुळे घरावर आर्थिक भार वाढतो.

भारतात 18 वर्षांखालील किमान १.५ लक्ष मुलींची लग्न होतात, ज्यामुळे  जगातील सर्वात जास्त बाल वधूचे घर भारताला मानले जातात आणि ही आकडेवारी एवढी मोठी आहे की  – जागतिक एकूण संख्येच्या एक तृतीयांश भाग भारताचा आहे. खरतर ही आकड़ेवाड़ी लज्जास्पद आहे बालविवाह रोखण्यासाठी आपण अनेक उपाय केले आहेत पण सुधारणा अजूनही हवी तशी नाहीये बालविवाह का होतात, कोणत्या समाजगटात होतात. त्यामागे असणारे प्रश्न काय, हे संशोधनातून पुढे आले आहे. बालविवाह रोखायचे, तर या प्रश्नांवर सखोल चर्चा घडावी. बीडसारख्या जिल्ह्यांतून ऊसतोड करण्यासाठी मजूर राज्यभर जातात. पती आणि पत्नीची एकत्र मजुरी ठरते. गरिबीमुळे लवकर विवाह होतात. अनेक जिल्ह्यांत रोजगारासाठी स्थलांतर होते. तेथे बालविवाह अधिक आहेत.

कारणे

आदिवासी समाजाचे जगणे वेगळे आहे. जंगलतोड झाल्यामुळे त्यांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न वाढले आहेत. भटक्याविमुक्त समाजाचे प्रश्न आणखी वेगळे. असे अनेक प्रश्न प्रत्येक भागात, प्रत्येक समाजात आहेत. करोना काळात त्यात भर पडली. रोजगार नाहीत. शाळा बंद आहेत म्हणून माध्यान्ह भोजन बंद आहे. त्या बदल्यात दिलेल्या योजना पूर्णपणे पोहोचलेल्या नाहीत. मग अशा मजबुरीत एक खाणारे तोंड कमी, असे पाहण्याची वेळ कित्येक कुटुंबांवर येते, ही जाणीव ठेवावी लागते. दरम्यान, महिला व बालविकास विभागाने या प्रश्नांवर अभ्यास समिती नेमली आहे. त्यातून सकारात्मक उपाय योजले जातील, अशी अपेक्षा आहे.

बालविवाहाच्या विरोधात असलेली सामाजिक चळवळ

स्वयंसेवी संस्थांचा सहभाग:

बालविवाहाच्या विरोधात अनेक स्वयंसेवी संस्था (NGOs) काम करत आहेत. ‘क्राय’, ‘कबीर’, ‘बचपन बचाओ आंदोलन’ यांसारख्या संस्था मुलींच्या शिक्षणाला आणि आरोग्याला प्रोत्साहन देतात. या संस्थांच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी गाव-स्तरीय आणि राज्य-स्तरीय मोहीमा राबवल्या जातात.

समाजातील व्यक्तींचा सहभाग:

काही ठिकाणी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, स्थानिक नेते आणि धार्मिक नेते बालविवाहाच्या विरोधात बोलू लागले आहेत. त्यांच्या सहभागामुळे या विषयावर जागरूकता निर्माण होत आहे. शिक्षण घेतलेल्या तरुण आणि तरुणींनी या चळवळीत सहभागी होणे आवश्यक आहे.

लेख आवडल्यास तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि टिप्पणी पोस्ट करा Newser Friendly आता WhatsApp चॅनेलवर उपलब्ध आहे. तुमच्या चॅटवर न्यूजर फ्रेंडली कडून सर्व नवीनतम लेख मिळविण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment

Exit mobile version