नवरात्री – दिवस ३: स्त्री शक्तीची पूजा – चंद्रघंटा

Source : Pinterest

चंद्रघंटा

(Navratri )नवरात्री मध्ये हे रूप  म्हणजे  पार्वती चे लग्ना नंतर चे  रूप सध्या च्या काळात विवाहित स्त्रियां सोबत होणाऱ्या हिंसाचाराची आकडेवारी पहिली तर स्त्री शक्तीचा विरोधाभास आणि द्विमुखी मानवाची कारकिर्दी ठळकतेने उठून दिसेल.

श्लोक

पिण्डज प्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकैर्युता। प्रसीदम तनुते महयं चन्द्रघण्टेति विश्रुता।।

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रुपाची आराधना केली जाते. या रुपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात. चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते.चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते. देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते.

जेंव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेंव्हा आपले मन,आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते. चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतिक आहे.

घरगुती हिंसाचार

Source : Pinterest

कोरोना नंतर घरगुती हिंसाचारात ३१ % नी वाढ झाली आहे,कोरोना मुळे झालेल्या बेरोजगारी, आर्थिक संकट, वाईट व्यसन आणि ह्या सर्वांचा शिकार बनली ती घरातली देवी.

NCRB ने प्रस्तुत केलेल्या आकडेवारी नुसार २३,७२२ घटना एका वर्षात नोंदवल्या गेल्या आणि ज्या महिलांनी आवाज उठवलाच नाही त्यांच काय ?

आर्थिक कोंडी होईल या भीतीने अनेक महिला विवाहांतर्गत असलेली हिंसा सहन करत राहतात. त्याबद्दल कुणाकडेही बोलत नाही. तरुण मुली, एकट्या महिलांवर अत्याचार झाला तर त्या काहीवेळा तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येतात. मात्र या महिला समुपदेशनामध्ये व्यक्त होतात. तक्रारीचे कोणतेही माध्यम नसणे, मुलांच्या जबाबदारीने या नात्यातून बाहेर पडण्याची मानसिक-शारीरिक आर्थिक तयारी नसल्याने ही हिंसा सहन करत राहणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढते आहे.

Source : Pinterest

ज्या वेळेस आपण सर्व घरात रहा सुरक्षित रहा चा नारा देत होतो, तेव्हा घरात सुरक्षितता किती आहे हे क्रूर आणि भ्रष्ट बुद्धीच्या मानवानी आपल्याला दाखवून दिलंय.

सरकारने अनेक हेल्पलाइन क्रमांक बनवले आहेत, अनेक कमिशन ची स्थापना केली आहे , कठोर कायदे सुद्धा बनवले आहेत परंतु ते कुठवर आमलात आणले जातात ?

आपण कित्येक वेळा आरोप करतो की हे कायदे फक्त कागदोपत्री आहेत

पण ह्या सर्वासाठी प्रशासना सोबत आपण ही तितकेच जबाबदार आहोत , शेजारी एखादी महिला जर अश्या अन्यायाला बळी पडत असेल तर आपण पाहिले हा विचार करतो, जाऊदे आपल्याला काय करायचय ते नवरा बायकोच भांडण आहे आपण नको मध्ये पडायला, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तिचे प्रेत दारा समोरून निघते तेव्हा मनात विचार येतो काल जर तिला मदत केली असती तर जिवंत असती.

म्हणून आम्ही म्हणतो तिला देवी चा दर्जा नकोय, किमान तिला मानवाचा दर्जा देऊन बघा.

घरच्या लक्ष्मीला प्रसन्न ठेवा तुम्हाला पैशासाठी लक्ष्मीची पूजा करावी लागणार नाही. आज ती होती म्हणून तुम्ही आहात, ती आहे म्हणून तुम्ही आहात आणि उद्या ती असेल तरच तुमच अस्तित्व टिकून राहील.

लेख आवडल्यास तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि टिप्पणी पोस्ट करा Newser Friendly आता WhatsApp चॅनेलवर उपलब्ध आहे. तुमच्या चॅटवर न्यूजर फ्रेंडली कडून सर्व नवीनतम लेख मिळविण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment

Exit mobile version